श्री राम स्तुती | Shree Ram Stotram |
श्री राम स्तुती हे हिंदू देव विष्णूचा सातवा अवतार भगवान राम यांना समर्पित एक भक्तिगीत आहे. ही एक शक्तिशाली प्रार्थना आहे जी प्रभू रामाच्या गुणांची आणि गुणांची प्रशंसा करते आणि संरक्षण, समृद्धी आणि आध्यात्मिक वाढीसाठी त्यांचे आशीर्वाद मागते.
श्रीराम स्तुती भक्तीने आणि प्रामाणिकपणाने पाठ केल्याने मनःशांती, वाईट शक्तींपासून संरक्षण आणि इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. भगवान रामाच्या दैवी उर्जेशी जोडण्याचा आणि जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये त्यांची दैवी कृपा मिळविण्याचा हा एक मार्ग आहे
॥ श्री राम स्तुती ॥
संसारसंगे बहु शीणलों मी ।
कृपा करी रे रघुराजस्वामी ।
प्रारब्ध माझे सहसा टळेना ।
तुजवीण रामा मज कंठवेना ॥ १ ॥
मन हे विकारी स्थिरता न ये रे ।
त्याचेनि संगे भ्रमतें भले रें ।
अपूर्व कार्या मन हे विटेना ।
तुजवीण रामा मज कंठवेना ॥ २ ॥
मायाप्रपंचीं बहु गुंतलों रे ।
विशाळ व्याधीमधें बांधलो रे ।
देहाभिमानें अति राहवेना ।
तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ३ ॥
दारिद्र्यदुःखे बहु कष्टलो मी ।
संसारमायेतचि गुंतलो मी ।
संचित माझे मजला कळेना ।
तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ४ ॥
लक्ष्मीविलासी बहु सौख्य वाटे ।
श्रीराम ध्यातां मनि कष्ट मोठे ।
प्रपंचवार्ता वदता विटेना ।
तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ५ ॥
अहोरात्र धंदा करितां पुरेना ।
प्रारब्धयोगें मज राहवेना ।
भवदुःख माझें कधिही टळेना ।
तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ६ ॥
तीर्थासि जातां बहु दुःख वाटे ।
विषयांतरी राहुनी सौख्य वाटे ।
स्वहीत माझें मजला कळेना ।
तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ७ ॥
मी कोठुनि कोण आलो कसा हो ।
स्त्रीपुत्रस्वप्नातचि गुंतलो हो ।
ऐसें कळोनी मन हे विटेना ।
तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ८ ॥
असत्य वाक्यांनि मुकाच झालो ।
अदत्तदोषें दुःखी बुडालो ।
अपूर्व करणी कशी आठवेना ।
तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ९ ॥
अब्रह्ममूर्ती भज रामसिंधू ।
चैत्यन्यस्वामी निजदीनबंधू ।
अभ्यंतरी प्रेम मनीं ठसेना ।
तुजवीण रामा मज कंठवेना ॥ १० ॥
विश्रांति देहीं अणुमात्र नाहीं ।
कुळाभिमानें पडलों प्रवाहीं ।
अशांतुनी दूर कधी कळेना ।
तुजवीण रामा मज कंठवेना ॥ ११ ॥
विषयीं जनांनी मज आळवीले ।
प्रपंचपाशांतचि बूडविले ।
स्वहीत माझें मजला दिसेना ।
तुजवीण रामा मज कंठवेना ॥ १२ ॥
नरदेहदोषां वर्णू किती रे ।
उच्चर माझें मनि वाटती रे ।
ललाटरेषा कधि पालटेना ।
तुजवीण रामा मज कंठवेना ॥ १३ ॥
मजला अनाथ प्रभु तूंचि दाता ।
मी मूढ की जाण असेंचि आतां ।
दासा मनीं आठव वीरसेना ।
तुजवीण रामा मज कंठवेना ॥ १४ ॥
श्री राम स्तुति
श्री राम स्तुति श्री रामचंद्र कृपालु भजमन
श्री राम स्त्रोत
श्री राम स्तुति लता मंगेशकर
श्री राम स्तुति लिखित में
श्री राम स्तुति फास्ट
श्री राम स्त्रोत हिंदी में
श्री राम स्तुति अनुराधा पौडवाल
श्री राम स्तुति भजन
श्री राम स्तुति श्री रामचंद्र कृपालु भजमन
हरण भव भय दारुणम्
shree ram stuti
shree ram stotram
shree ram status video
shree ram stuti with lyrics
shree ram status 4k
shree ram stuti fast
shree ram studio
shree ram stuti lofi
shree ram stuti rasraj ji maharaj
shree ram story
#श्री #राम #स्तुति #shree #ram #stuti #singer #sureshwadkar #song #mantra #hindugod #bhajans #bhaktisong
नवीन व्हिडिओ सूचना मिळवण्यासाठी मराठी भक्ती 1001चॅनेलची सदस्यता घ्या.
/ @marathibhakti1001
Subscribe to MarathiBhakti1001 channel to get new video notifications.
/ @marathibhakti1001
#मराठीभक्ती1001
#MarathiBhakthi1001
⚜️व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद ⚜️
⚜️Thank you for watching Video ⚜️
コメント